महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटांची चोरी; मात्र, अद्यापही गुन्हा दाखल नाही - nashik currency note press robbery

नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांची छपाई होते. याच प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याची दोन आठवड्यापूर्वी घटना घडली आहे. याबाबत करन्सी प्रेसमध्ये कर्मचाऱ्यांची गोपनीय रित्या चौकशी सुरू असल्याचे समजते.

NASHIK NOTE PRESS
नाशिक करन्सी नोट प्रेस

By

Published : Jul 13, 2021, 1:10 PM IST

नाशिक -येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. करन्सी नोट प्रेसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांची छपाई होते. याच प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याची दोन आठवड्यापूर्वी घटना घडली आहे. याबाबत करन्सी प्रेसमध्ये कर्मचाऱ्यांची गोपनीय रित्या चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र, दोन आठवडे होऊन सुद्धा अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने करन्सी प्रेसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेत 2000 आणि 500च्य नोटांचा समावेश आहे. तर 5 लाखांच्या नोटा चोरी झाल्याचा अंदाज असला तरी ही रक्कम अधिक असल्याची चर्चा होत आहे.

या धक्कादायक घटनेच्या निमित्ताने पुढील काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

  1. करन्सी नोट प्रेसमध्ये केंद्रीय सुरक्षा रक्षक तैनात असताना हा प्रकार कसा घडला?
  2. या प्रेसमध्ये कर्मचारी येताना-जाताना त्यांची तपासणी केली जाते. मग चोरी झाली कशी?
  3. हा चोरीचा प्रकार किती दिवसांपासून सुरू आहे?
  4. चोरीची घटना होऊन दोन आठवडे होऊन अद्याप चौकशी का झाली नाही?
  5. प्रेसमधील सुरक्षा कमकुवत आहे का?
  6. अद्याप पोलिसात गुन्हा का दाखल केला नाही?
  7. तेलगी घोटाळा नंतर पुन्हा एका घोटाळ्याची शक्यता आहे का?

ABOUT THE AUTHOR

...view details