महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tempo Accident Malegaon : मालेगाव-चाळीसगाव मार्गावर भीषण अपघात; ५ ठार, तर 12 जण जखमी - मालेगाव-चाळीसगाव मार्गावर भीषण अपघात

टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात तब्बल ५ जण ठार झाले आहेत. तर १२ जण जखमी झाले आहेत. मालेगाव चाळीसगाव मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. टेम्पोत एकूण २५ जण असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातग्रस्त टेम्पो
अपघातग्रस्त टेम्पो

By

Published : Mar 6, 2022, 9:02 PM IST

नाशिक -मालेगाव चाळीसगाव मार्गावर टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात तब्बल ५ जण ठार झाले आहेत. तर १२ जण जखमी झाले आहेत. यातील ७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालेगाव चाळीसगाव रोडवर गिगाव फाट्यावर ही घटना घडली. काही जखमीना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोत एकूण २५ जण असल्याची माहिती समोर आली आहे. सुनिता शिवलाल पाटील, आबाजी जालम पाटील, रत्नाबाई कांतीलाल पाटील, बळीराम रामचंद्र पाटील, वैष्ण सुहालाल पाटील, पोपट महादू पाटील, गोविंदा रतन पाटील, अनुसुयाबाई रतन पाटील, विजय रामराव पाटील, अशी जखमींची नावे आहेत.


भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अज्ञात वाहनाने मागच्या बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताच्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १२ पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त हे चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा या गावचे असल्याची माहिती मिळाली आहे. ते चंदनपुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर परत जाताना अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनातून २५ जण प्रवास करत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा -अडीच कोटींचे सोने-चांदीचे दागिने घेऊन फरार होण्याचा फसला डाव; बल्लारपूर रेल्वे पोलिसांकडून टोळीला बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details