नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात आज दिवसभरात 44 रुग्ण वाढ झाल्याने कसमादे परिसरात भितीचे वातावरण आहे. आज सायंकाळी मालेगाव एकूण 114 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यात 102 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मालेगाव शहराची रुग्ण संख्या 171 झाली असून, यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण 193 रूग्ण झाले आहेत.
मालेगावात एकाच दिवसात 44 कोरोनाग्रस्तांची भर; नाशिक 193 तर मालेगावची एकूण रुग्ण संख्या 171 वर
मालेगावमध्ये आज सकाळी प्राप्त अहवालानुसार शहरातील 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते त्या पैकी 4 रुग्णांचे अहवाल हे दुसऱ्या चाचणीत पॉझिटिव्ह आले आहे. तर उर्वरित 32 अहवाल हे नवीन होते. तर आताच प्राप्त अहवालानुसार 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, शहरातील रुग्णांची संख्या 171 वर जाऊन पोहचली आहे.
आज सकाळी प्राप्त अहवालानुसार शहरातील 36 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते त्या पैकी 4 रुग्णांचे अहवाल हे दुसऱ्या चाचणीत पॉझिटिव्ह आले आहे. तर उर्वरित 32 अहवाल हे नवीन होते. तर आताच प्राप्त अहवालानुसार 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, शहरातील रुग्णांची संख्या 171 वर जाऊन पोहचली आहे. दोन दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कुठलीही वाढ झाली नसल्याने त्यातच 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे मालेगाव शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज एकदम 44 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने मालेगाव परिसरात घबराट पसरली आहे.
प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या 171 झाली असून, यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 7 रुग्ण बरे झाले असून, त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये 6 रुग्ण मालेगाव शहरातील असून एक चांदवड येथील तरूण आहे.
दरम्यान, आज मालेगावमधील जवळपास 150 हून अधिक अहवाल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे सर्व स्वॅब वेगवेगळ्या दिवशी घेतले होते. मात्र, किटच्या अभावी त्याबद्दलचे अहवाल प्राप्त होत नव्हते. आता आपण कीट पाठवल्यानंतर हे अहवाल तातडीने प्राप्त होत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त दिसत असली तरी ती एका दिवशी एकदम पॉझिटिव्ह आलेले रुग्ण नसून, आतापर्यंत साठलेल्या वेगवेगळ्या दिवसांचे ते रुग्ण आहेत. त्यामुळे एकंदरीत पहिला रुग्ण आढळून आले पासून आतापर्यंत ठराविक गतीने दररोज रुग्ण वाढत आहेत. अद्यापही बहुतांश रुग्ण हे मूळ रुग्णाच्या सहवासात आलेलेच व्यक्ती आहेत व ते यापूर्वी आपण क्वारांटाईन केले असल्याचे सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक यांनी सांगितले आहे