नाशिक- पंचवटी परिसरातील हेमकुंज येथील तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. ही इमारत मोडकळीस आल्याने गेल्याच महिन्यात तिला रिकामी करण्यात आले होते. त्यामुळे येथे मोठी जीवितहानी टळली आहे.
नाशिकात ४० वर्षे जुनी इमारत कोसळली; कुठलीही जीवितहानी नाही - pwd
पंचवटी परिसरातील हेमकुंज येथील तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
![नाशिकात ४० वर्षे जुनी इमारत कोसळली; कुठलीही जीवितहानी नाही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3777211-thumbnail-3x2-ty.jpg)
मखमलाबाद नाक्यावरील मधुबन कॉलनीनजीक असलेली ही इमारत ४० वर्षे जुनी होती. ती जीर्ण होऊन मोडकळीस आलेली होती. आज पहाटेच्या सुमारास ती कोसळली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या इमारतीमधील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलासह बांधकाम विभागाच्या पथकाने इमारतीचा मलबा दूर करण्याचे काम सुरू केले आहे.
नाशिक जिल्ह्यात पुष्कळ वर्ष जुने वाडे व इमारती आहेत. या मोडकळीस आलेल्या इमारती पडण्याच्या घटना वारंवार सुरूच आहेत. दरम्यान, प्रशासन आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज झालेल्या घटनेत मोठी जीवितहानी टळली आहे.