नाशिक :श्रीखंड म्हटले की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. जेवणात गोड म्हटले की, अनेक जण पारंपरिक पौष्टिक श्रीखंडाला पसंती देतात. म्हणून श्रीखंड हा सर्वाधिक लोकप्रिय गोड पदार्थांपैकी एक आहे. सणासुदीला हमखास अनेकांच्या घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. मात्र अनेकदा श्रीखंड हा पदार्थ सर्वच ठिकाणी दर्जेदार मिळतो, असे नाही. नाशिक शहरात राहणाऱ्या दोन भावांनी श्रीखंड प्रेमींची गरज ओळखून खास श्रीखंडाचे आउटलेट सुरू केले आहे. त्यात त्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांची पसंती ओळखून तब्बल 40 प्रकारचे श्रीखंडचे फ्लेवर तयार केले आहेत. त्यांच्या या फ्लेवरला सर्वच श्रीखंड खवय्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच त्यांनी इतर शहरात देखील 'द श्रीखंड स्टुडिओ'च्या शाखा सुरू केल्या आहेत.
Bapte Bandhu Shrikhand: 'येथे' मिळते तब्ब्ल 40 प्रकारचे पारंपारिक श्रीखंड; देशातून नाहीतर परदेशातून देखील श्रीखंड प्रेमींची मोठी मागणी - varieties of Shrikhand
नाशिकच्या बाप्ते बंधूनी पारंपरिक श्रीखंडाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांनी एक -दोन नाही तर तब्बल 40 प्रकारचे श्रीखंड तयार केले आहे. त्यांच्या या श्रीखंडाला देशातून नाहीतर परदेशातून देखील श्रीखंड प्रेमींची मोठी मागणी होत आहे.
'अशी' सुचली कल्पना :मी आणि माझा भाऊ अविनाश आम्ही तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात श्रीखंडाचा आस्वाद घेत होतो. तेव्हा श्रीखंड हा पारंपारिक पदार्थ आहे आणि तो एकाच प्रकारात मिळतो, हेच श्रीखंड हे अनेक फ्लेवरमध्ये मिळाले तर सर्व वयोगटातील नागरिक याचा आस्वाद घेऊ शकते, असा विचार आम्ही केला. श्रीखंड हे शरीराला पौष्टिक आहे. मात्र,हा पदार्थ सध्या बाजारात फक्त दोन तीन प्रकारात उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही त्यावर दीड वर्ष अभ्यास करून तब्बल 40 प्रकारचे श्रीखंडचे फ्लेवर बनवले. श्रीखंड बनवताना चवीचा आम्ही अगदी बारकाईने विचार केला. पारंपारिक चव तशीच ठेवत नवीन प्रोडक्ट आणि फ्लेवर तयार केले. यात अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारे फ्लेवर आम्ही तयार केले आहेत. सुरुवातीला छोट्याखाणी सुरू केलेल्या श्रीखंडाला आता मोठी मागणी आहे, असे मनोज बाप्ते यांनी सांगितले.
'हे' आहेत श्रीखंडाचे फ्लेवर?अफगन ड्रायफ्रूट्स, मावा बदाम, केशर किंग, पान मसाला, ट्राफिक जाम, काजू द्राक्ष, शाही अंजीर, पायनॅपल, शाही गुलकंद, पेरी फेरी, स्टोबेरी, ब्ल्यूबेरी, सिताफळ, मिक्स फ्रुट, क्लासिक इलायची, मँगो, केशर राजभोग, अमेरिकन नट्स, चोको अल्मोंड, ब्रावणी, पेरू, ऑरेंज, लेम, चॉकलेट अँड नट्स, कॉफी क्रंबल, ड्रायफ्रूट व्हॅनिला, जेरी, चीली, मोहितो, चॉकलेट बनाना, मँगो मस्तानी, केशर इलायची, फ्रूट फ्युजन, केशर पिस्ता, पंचरत्न नट्स, बटर स्कॉच, रजवडी, नवरत्न नट्स, मड चॉकलेट, काजू,मलई, चॉकलेट अँड कुकीज, जांभूळ हे फ्लेवर आहेत.