नाशिक- आज 12 मे ला जागतिक परिचारिका दिन हा सर्वत्र साजरा केला जात आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच ठिकाणी परिचारिका आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रत्येक सर्वसामन्य नागरिक करत आहेत. मात्र, असे असताना महाराष्ट्र राज्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या परिचारिकांच्या पगारात 40 टक्के कपात करण्यात आली आहे.
कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले असून भारत देशात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाच्या लढाईत आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर,परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत.