नाशिक- गुडीपाडव्यानिमित्त नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिर परिसरात काढण्यात आलेली भव्य रांगोळी भविकांचे आकर्षण ठरत आहे. या रांगोळीच्या माध्यमातून भारतीय सणाचे महत्व पटवून देण्यात आले आहे.
गुडीपाडव्यानिमित्त नाशिकच्या कालिका मंदिरात साकारण्यात आली भव्य रांगोळी - नववर्ष
गुडीपाडव्यानिमित्त नाशिकच्या कालिका मंदिरात ४० बाय ४० फूट अशी भव्य रांगोळी साकारण्यात आली.
नववर्ष यात्रा स्वागत समितीच्या ४० महिला कलाकारांनी एकत्र येत ४० बाय ४० फूट अशी भव्य रांगोळी साकारली आहे. या रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेले सण दाखवण्यात आले आहेत. यात गुडीपाडवा, रक्षाबंधन, वटपौर्णिमा, नागपंचमी, होळी, दिवाळी आदींचे रांगोळीच्या माध्यमातून चित्रण करण्यात आले आहे. तसेच आधुनिक युगात महिलांचे पारंपरिक आभूषणे लुप्त होत असून त्यावर देखील रांगोळीचा माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
श्री कालिका माता मंदिरात चैत्रनिमित्त आकर्षक गुड्या उभारण्यात येणार असून विविध धार्मिक सोहळे होणार आहेत. त्यामुळे मंदिराला आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.