महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून ४ मजुरांचा मृत्यू, ठेकेदारांसह ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

शहरातील गंगापूर रस्त्यावरील सोमेश्वर कॉलनी येथे मंगळवारी  पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली होती. यामधील मृतांचा आकडा आता ४ वर गेला आहे. अपना घर या ग्रुप प्रकल्पातील मजुरांसाठी ही टाकी बांधण्यात आली होती.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून ४ मजुरांचा मृत्यू

By

Published : Jul 3, 2019, 12:24 PM IST

नाशिक - शहरातील गंगापूर रस्त्यावरील सोमेश्वर कॉलनी येथे मंगळवारी पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली होती. यामधील मृतांचा आकडा आता ४ वर गेला आहे. अपना घर या ग्रुप प्रकल्पातील मजुरांसाठी ही टाकी बांधण्यात आली होती. मृतांमध्ये बिहार आणि ओरिसाच्या मजुरांचा समावेश आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून ४ मजुरांचा मृत्यू


2 जुलैला गंगापूर रोडवरील सोमेश्वर कॉलनी परिसरात निर्माणधीन असलेल्या अपना घर या ग्रुप प्रकल्पातील मजुरांसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली होती. दरम्यान, या ठिकाणी बांधण्यात आलेली टाकी आरसीसीऐवजी साधे बांधकाम करून उभारण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे तज्ञांनी मत व्यक्त केले होते. यानंतर रात्री उशीरा रौनक इन्फ्राचे बांधकाम ठेकेदार भाविक पटेल, श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड हाऊसिंग इंडियाचे सुजय गुप्ता, आशिष सिंग प्रकल्प व्यवस्थापक सचिन शेवडे, सुरक्षा अभियंता नारायण कडलग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुजोय गुप्ता वगळता इतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.


राधाकृष्ण गमे महानगरपालिका आयुक्त


घटनास्थळाची पाहणी केली असता, पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. या घटनेत मजुरांची कुठलीही चूक नसताना त्यांचा बळी गेला. शहरातील इतर नवीन बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना सुरक्षीतता पुरवण्यासाठी बारकाईने लक्ष देण्यात येणार आहे. तसेच अग्निशामक व नगरविकास विभागाला पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.


मृत मजुरांची नावे

अतुल बारी
सनाबी मजहर शेख
सुदाम गहीर
अनामी चंद्र

ABOUT THE AUTHOR

...view details