नाशिक - अंबड लिंक रोडवरील एका घरात सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले. रविंद्र ठाकरे, शैला ठाकरे, शुभम ठाकरे व संजय ठाकरे अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चार जण गंभीर - nashik
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की घरावरील पत्रे उडाले. या घटनेत कुटुंबातील ४ जण गंभीर भाजले गेले.
आज सकाळी शैला ठाकरे या स्वयंपाक करत असताना घरातील गॅसमध्ये गळती झाली. यामुळे काही क्षणातच त्याचा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की घरावरील पत्रे उडाले. या घटनेत कुटुंबातील ४ जण गंभीर भाजले गेले. मात्र काही क्षणात नागरिकांनी घराकडे धाव घेत जखमींना बाहेर काढून सरकारी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमध्ये शैला ठाकरे या जास्त प्रमाणात भाजल्या गेल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून या सर्व जखमींवर सरकारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.