महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Accident News: लासलगाव येथे टॉवर वॅगेन ट्रेनने कर्मचाऱ्यांना उडविले; चार जणांचा मृत्यू

लासलगाव येथे टॉवर वॅगेन ट्रेनने कर्मचाऱ्यांना उडविले आहे. यात चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली.

Nashik News
टॉवर वॅगेन ट्रेनने कर्मचाऱ्यांना उडविले

By

Published : Feb 13, 2023, 9:46 AM IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लासलगाव रेल्वे स्थानकावर आज पहाटे 5.44 वा दरम्यान टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते.

जबर मार लागण्याने मृत्यू :किमी 230 व पोल नंबर 15 ते 17 मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असताना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणाताना टॅावरने धडक दिली. अपघातात त्यांना जबर मार लागण्याने 4 जणांनाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे) ,संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) यांचा समावेश आहे.

18 जानेवारीची घटना :नागपुरातील डोंगरगाव येथे रेल्वे रूळ ओलांडताना तरूणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना ही तरूणी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. मृत विद्यार्थिनी आरती मदन गुरव (१९) ही हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फटकावरून जात होती. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत-बोलत जात होती. रेल्वे रूळ ओलांडून जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रेनच्या समोर आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता.


हेडफोनने केला घात : आरती कॉलेजला जात असताना वाटेत रेल्वे ट्रॅक ओलांडून जावे लागत होते. आरती बसमधून उतरली तेव्हापासून मोबाईलवर बोलत चालली होती. ती बोलण्यात इतकी गुंग झाली होती की तिच्या बाजूने जाणाऱ्या गाडीचा आवाजसुध्दा तिला ऐकू येत नसावा. आरतीने बोलण्याच्या नादात रेल्वे ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्या भागात असलेल्या अनेकांनी तिला आवाज देऊन थांबवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, आरतीच्या कानात हेडफोन लागले होते. त्यामुळे तिच्यापर्यंत कुणाचा आवाजच पोहचू शकला नव्हता.

हेही वाचा : Meerut Road Accident : दारूच्या नशेत ट्रक चालकाची कारला फिल्मी स्टाईलने धडक! 3 किमीपर्यंत फरपटत नेले!

ABOUT THE AUTHOR

...view details