महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून चौघांचा मृत्यू - अवकाळी

अवकाळी पावसामुळे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावातील अनिल गवे (वय - ३२), सागर गवे (वय - १७) आणि रोहित गायकवाड (वय - १८) हे तीनही तरुण क्रिकेट खेळत होते. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह वीज कोसळली. यात या तीनही तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वीज कोसळल्याने नाशिकमध्ये ४ जणांचा मृत्यू

By

Published : Apr 14, 2019, 10:09 PM IST

Updated : Apr 14, 2019, 11:41 PM IST

नाशिक- जिल्ह्यात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान विज कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात दिंडोरी तालुक्यातील ३ युवकांचा तर चांदवड तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे.

वीज कोसळल्याने नाशिकमध्ये ४ जणांचा मृत्यू

अवकाळी पावसामुळे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावातील अनिल गवे (वय - ३२), सागर गवे (वय - १७) आणि रोहित गायकवाड (वय - १८) हे तीनही तरुण क्रिकेट खेळत होते. दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह वीज कोसळली. यात या तीनही तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वादळी पावसामुळे चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथे रात्री साडेआठ वाजता जनाबाई सुभाष रंजाणे (वय ३५) या मजुरी करणाऱ्या महिलेचा वीज पडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

त्याचप्रमाणे अचानक आलेल्या वादळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे श्रीमती यमुनाबाई गुंजाळ यांच्या शेतामध्ये वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला. तर येवला तालुक्यातील देवठाण येथे शिवनाथ जाधव यांच्या शेतामध्ये वीज पडून त्यांच्या एका गायीचा मृत्यू झाला. दरम्यान, या अवकाळी वादळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

Last Updated : Apr 14, 2019, 11:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details