महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; 4 भाविक ठार - आयशर टेम्पो

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना भाविकांवर काळाने घाला घातला. यावेळी झालेल्या अपघातात ४ भाविक ठार झाले, तर ६ भाविक जखमी झाले आहेत.

अपघातात झखमी झालेले भाविक

By

Published : May 20, 2019, 8:14 AM IST

Updated : May 20, 2019, 10:28 AM IST

नाशिक - सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ भाविक ठार झाल्याने खळबळ उडाली. गणेश भक्तीप्रसाद ठाकूर, कुणाल कैलास ठाकूर, आशिष माणिक ठाकूर, सागर अशोक ठाकूर हे चार तरुण अपघातात जागीच ठार झाले आहेत. हा अपघात वणीजवळील कृष्णा गावाशेजारी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

अपघातात झखमी झालेले भाविक


भाविक सप्तश्रृंगी गडावर नवसपूर्ती करण्यासाठी गेले होते. तेथून रात्री उशीर झाल्याने नाशिकला परतताना कृष्णा गावानजीक आयशर गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाने गाडी रस्त्यातील गतिरोधकाजवळ थांबविली. त्यामुळे काही भाविक गाडीतून उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. या धडकेत चार जण जागीच ठार झाले तर इतर वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुष व महिलांसह लहान मुलांचा समावेश आहे.

ट्रक आणि टेम्पो
जखमीत नाशकातील पंचवटीच्या लिलाबाई अशोक ठाकूर, अनिल रमेश ठाकूर, माणिक चींतूलाल ठाकूर, पल्लवी ठाकूर, धुप बिंद्राबन ठाकूर, रंजीता धुप्र ब्रिंद्राबन ठाकूर यांचा समावेश आहे.
Last Updated : May 20, 2019, 10:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details