येवला (नाशिक) - मालमत्ता थकबाकी न भरल्याने मक्याचे गोडाऊन येवला नगरपालिकेने सील केले आहे. ( Yeola Nagar Panchayat Godawn Seal ) येवला नगरपालिका हद्दीतील नांदेसर शिवारातील गोडाऊन मालकाकडे 33 लाख 44 हजार 510 रुपये थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊन देखील थकबाकी न भरल्याने येवला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर मक्याचे गोडाऊन सील केले आहे.
येवला नगरपालिका हद्दीतील नांदेसर शिवारातील नम्रता अमोल ठाकूर यांच्याकडे 16 लाख 79 हजार 897 रुपये तसेच आशाबाई प्रभाकर ठाकूर यांच्याकडे 16 लाख 64 हजार 613 रुपये असे एकूण 33 लाख 44 हजार 510 रुपये सन 2021/2022 सन अखेर थकबाकी असून ती भरत नसल्याने मक्याचे गोडाऊन सील करण्यात आले आहे.