महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात पलंगावरून पडून ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

नाशकात पलंगावरून पडून ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भाग्यश्री हनुवटे, असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

3 years old girl died nashik
नाशिक जिल्हा रुग्णालय

By

Published : Dec 7, 2019, 5:31 PM IST

नाशिक -पलंगावरून खाली पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील पाथर्डीजवळील वासन नगर येथे ही घटना घडली. भाग्यश्री हनुवटे, असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

हे वाचलं का? - कांदा प्रतिक्विंटल ५ हजार दर; व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

भाग्यश्री शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पंलगावर खेळत होती. त्यावेळी ती अचानक खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे हनुवटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

हे वाचलं का? - चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

दरम्यान, तिच्या मृत्युप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details