नाशिक- मुथ्थुट फायनान्स दरोडा प्रकरणात वापरण्यात आलेल्या ३ मोटरसायकल नाशिकच्या पेठरोड भागातील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी बेवारस स्थितीत पोलिसांना आढळून आल्या. या घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला आहे. दरोडेखोरापर्यंत पोहोचण्यासाठी या गाड्याची मदत होणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुथ्थुट फायनान्स दरोडा : नाशिकच्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी सापडल्या तीन मोटारसायकली - दरोडा
मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात वापरण्यात आलेल्या ३ मोटरसायकल नाशिकच्या पेठरोड भागातील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी बेवारस स्थितीत पोलिसांना आढळून आल्या. या घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला आहे. दरोडेखोरापर्यंत पोहोचण्यासाठी या गाड्याची मदत होणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी नाशिकच्या सिटी सेंटर मॉलजवळील मुथ्थुट फायनान्स कंपनीवर ५ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोळीबारात एका कर्मचारी ठार झाला होता तर ३ जण जखमी झाले होते. दिवसाढवळ्या टाकण्यात आलेल्या दरोड्यांच्या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारीमुळे सर्व स्थरातून पोलिसांना लक्ष्य केले जात आहे.
या दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकल आज पेठरोड भागातील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी मिळून आले. या तिन्ही पल्सर मोटरसायकल असून यातील नंबर प्लेट या बनावट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मोटरसायकलच्या माध्यमातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होईल, असे पोलीस अधिकाऱ्यांना वाटत आहे. या मोटरसायकलसोबत २ हेल्मेट तसेच एका गुन्हेगाराचा शर्टदेखील या ठिकाणी पोलिसांना मिळून आला आहे. शुक्रवारी गुन्ह्यानंतर पसार होताना सीसीटीव्हीत हे संशयित आरोपी दिसून आले होते.