नाशिक - मालेगावात दोन डॉक्टरांसह तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबांधितांची संख्या 42 वर गेली आहे.
मालेगावात आधी मिळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे आज लागण झालेल्या रुग्णांचे जवळचे नातेवाईक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. कोरोनाबाधित आढळून आलेल्या परिसरात आरोग्य सेवकांनी सर्वेक्षण केले. यावेळी संबंधित संशयित आढळून आले आहेत.
मालेगावात 2 डॉक्टरांसह तिघांना कोरोनाची लागण; जिल्ह्यातील एकूण आकडा 42 वर - corona in malegaon
मालेगावात दोन डॉक्टरांसह तीन जणांना कोरोनाची लागणं झाली असून जिल्ह्यातील कोरोनाबांधितांची संख्या 42 वर गेली आहे.
अद्याप मालेगाव महानगरपालिकेच्या रुग्णालयातून पाठवण्यात आलेले 43 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. तर सामान्य रुग्णालयातील 24 नमुन्यांचे अहवाल देखील प्रतीक्षेत आहेत. संबंधित अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे मालेगाव सामान्य रुग्णालयातून 75 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या
एकूण 42
मालेगाव शहर 37
नाशिक शहर 3
सिन्नर तालुका 1