नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात रात्री 9 च्या सुमारास भूकंपाचे Earthquake in Dindori taluka in nashik सौम्य धक्के जाणवले असून मेरी भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर तिव्रतेची Earthquake nashik news नोंद झाली आहे. नाशिक शहरापासून अवघ्या 17 किलोमीटरवर भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Earthquake nashik news नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 3.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के
जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात रात्री 9 च्या सुमारास भूकंपाचे Earthquake in Dindori taluka in nashik सौम्य धक्के जाणवले असून मेरी भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर तिव्रतेची Earthquake nashik news नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी तळेगाव, जांबुटके, उमराळे, मडकीजांब आदी भागात 16 ऑगस्टला रात्री नऊ वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत प्रांतअधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी ही माहिती मेरी भूकंप मापक केंद्र, तसेच जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात कळवल्यानंतर मेरी केंद्राकडून भूकंपाच्या घटनेला दुजोरा मिळाला असून रात्री 9 वाजेच्या सुमारास 3.4 रिश्टर स्केलच्या दोन धक्क्याची नोंद आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांतअधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी केले.
हेही वाचा -Union Minister Ramdas Athawale फोनवर हॅलो बोलण्यापेक्षा वंदे मातरम बोलणे योग्यच