नाशिक- पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे फाटा येथे ट्रॅक्टर आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
नाशकात ट्रॅक्टर-रुग्णवाहिकेचा अपघात, 3 ठार तर एक गंभीर - रुग्णवाहिकेचा अपघात
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून रुग्ण नाशिकमध्ये घेऊन एक मारुती ओमिनी रुग्णवाहिका निघालेली होती. वडाळीभोई गावाच्या पुढे निघालेली रुग्णवाहिका शिरवाडे फाट्याजवळ आली असतानाच समोरून विरूद्ध दिशेने एक ट्रॅक्टर आला. या दोन्ही वाहनांच्यात समोरा-समोर धडक झाली. रुग्णवाहिका भरधाव वेगात असल्यामुळे रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला.
अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून रुग्ण नाशिकमध्ये घेऊन एक मारुती ओमिनी रुग्णवाहिका निघालेली होती. वडाळीभोई गावाच्या पुढे निघालेली रुग्णवाहिका शिरवाडे फाट्याजवळ आली असतानाच समोरून विरूद्ध दिशेने एक ट्रॅक्टर आला. या दोन्ही वाहनांच्यात समोरा-समोर धडक झाली. रुग्णवाहिका भरधाव वेगात असल्यामुळे रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला.
या अपघातात रुग्णवाहिकेतील महिला मोईद्दिन बागवान (वय 60), रफिऊद्दिन मोईद्दिन बागवान (वय 55) आणि कमरूबी मोहिनोद्दिन बागवान (वय 60) हे सर्व जागीच ठार झाले. तर, चालक सागर भिकन पाटील हादेखील गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर, पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नाशिक येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.