नाशिक -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांना फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून ग्रेस नामक एका महिलेने वैद्यकीय व्यवसाय करून जादा पैशाचे आमीष दाखून तब्बल 31 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 31 जुलैला ग्रेस नावाच्या एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. या महिलेने फेसबुक मैत्री करत व्हॉटसअॅपवर बोलण्यास सुरुवात केली. अशात ह्या महिलेने विश्वास संपादन करून मी लंडन येथे राहत असून आमची कंपनी भारतातून जिनसेन नावाचे आयुर्वेदिक औषध खरेदी करत असते. पण, सध्या पुरवठा करणारी कंपनी जादा नफा घेत असून आम्ही दुसरा पुरवठादार शोधत आहे. या औषधाचा वापर मेंदू उपचार वेदनाशामकसाठी होत असल्याचे त्या महिलेने सांगितले. तुम्ही जर भारतातून याचा पुरवठा आम्हाला करत असाल तर आपण 50-50 टक्के नफा वाटून घेऊ, असे आमिष दाखवले. तसेच हे औषध तुम्हाला अरुणाचल प्रदेश येथील बालाजी इंटरप्राइजेस येथून खरेदी करून मला पाठवावे लागेल असेही सांगितले. यानंतर टिळे यांनी या कंपनी सोबत मेल व फोनवर संपर्क साधला आणि या कंपनीने जिनसेन व बिया पुरवण्याबाबत वेगवेगळे कारण देत बँक खात्यावर पैसे टाकण्यास सांगितले.
नाशिक : राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांना सायबर क्राईमच्या माध्यमातून 31 लाखांचा गंडा - नाशिक सायबर क्राइम बातमी
मी लंडन येथील एका कंपनीत असून त्यासाठी लागणारे साहित्य भारतात मिळते. तुम्ही ते साहित्य पाठवून द्या आपण 50-50 टक्के नफा वाटून घेऊ, असे आमिष दाखवत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांना एका महिलेने 31 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
टिळे यांनी देखील टप्याटप्याने कंपनीच्या बँक खात्यावर 31 लाख 27 हजार रुपये पाठवले. मात्र, पैसे देऊनही औषध मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नाशिकच्या सायबर पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी मुंबईच्या कांदीवली येथून अभिषेक जैन, नितीन पवार आणि राजस्थानहून किसनलाल तेली या संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करत आहे.
हेही वाचा -नोकरी गेली... मात्र, परिस्थितीवर मात करून सुरू केला स्वतःचा उद्योग