महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात 272 नव्या कोरोनाबाधितांची वाढ

नाशिक जिल्ह्यात रविवारी 272 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 11 हजार 933 वर पोहोचला असून 2 हजार 670 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

file photo
file photo

By

Published : Jul 27, 2020, 2:44 PM IST

नाशिक - जिल्ह्यात रविवारी (दि. 26 जुलै) 272 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 434 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

मालेगाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, नाशिक शहरातील 195, नाशिक ग्रामीण 66, मालेगाव 10, जिल्हाबाह्य एक जणाचा अहवाल कोरोनापॉझिटिव्ह आला आहे.

मृतांची संख्या

  • नाशिक ग्रामीण -107
  • नाशिक महापालिका हद्द - 247
  • मालेगाव महापालिका हद्द- 84
  • जिल्हाबाह्य- 19
  • एकूण - 457

नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती -

  • नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण -11 हजार 933
  • कोरोनामुक्त- 8 हजार 167
  • एकूण मृत्यू-457
  • उपचार घेत असलेले रुग्ण-2 हजार 670

उपचार घेत असलेले सक्रिय रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये 187, चांदवड 53, सिन्नर 140, दिंडोरी 47, निफाड 142, देवळा 48, नांदगाव 82, येवला 36, त्र्यंबकेश्वर 17, सुरगाणा 14, पेठ 3, कळवण 2, बागलाण 39, इगतपुरी 72, मालेगाव ग्रामीण 38, असे एकूण 919, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 658, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 86, तर जिल्ह्याबाहेरील 7, असे एकूण 2 हजार 670 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details