नाशिक- जिल्ह्यात भीषण दुष्काळ असून सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी गावात चारा आणि पाण्याअभावी १७ गाई आणि चार म्हशींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरात राज्यातून दूध व्यवसायासाठी आलेल्या काठेवाड नागरिकांची ही जनावरे होती.
दुष्काळाचा दाह.. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पाण्याअभावी १७ गाई आणि चार म्हशींचा तडफडून मृत्यू - sinner
जनावरांनी ज्वारी खाल्यानंतर त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कोमलवाडी येथील तलाठ्याकडून पंचनामा करण्यात येत असून. परिसरातील नागरीकांनी चारा छावणीची मागणी केली आहे.
कोमलवाडी भागात हे काठेवाड नागरिक गेल्या अनेक वर्षापासून दुधाचा व्यवसाय करतात. कोमलवाडी येथे या जनावरांनी ज्वारी खाल्यानंतर त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कोमलवाडी येथील तलाठ्याकडून पंचनामा करण्यात येत असून. परिसरातील नागरीकांनी चारा छावणीची मागणी केली आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. यात सिन्नर, येवला, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, सटाणा, चांदवड, बागलाण, मनमाड, नांदगाव आदी तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये सिन्नर भागात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
प्रशासनाच्या वतीने सुद्धा सिन्नर तालुक्यातील अनेक गावे वाड्या-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, असे असताना सुद्धा दुष्काळ मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांच्या समस्या अधिकच बिकट बनत चालल्या आहेत. प्रशासनाने सिन्नर तालुक्यांमध्ये चारा छावणी करावी, अशी मागणी केली जात आहे. तर जनावरांना देखील पाणी मिळतं नसल्याने, अशा घटना घडत आहेत.