नाशिक- जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवती महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तिचा कोरोनाचा अहवाल आज (दि. 5 मे) सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. नाशिकच्या समाज कल्याण कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बजरंगवाडीतील ही रहिवाशी असून काही महिन्यांपूर्वी ती सिन्नरवरुन प्रसूतीसाठी नाशिकला माहेरी आली होती. शहरातील कोरोनाचा हा पहिला बळी असून जिल्ह्यातील 13 वा बळी आहे.
नाशिकच्या बजरंगवाडीत ही महिला रहात होती. गेल्या 24 एप्रिल रोजी पोटात दुखत असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तिला डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. 2 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तिचा त्रास वाढल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करण्यासाठी प्रसुती विभागात दाखल करण्यात आले. तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. मात्र, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, तिचा कोणताही प्रवास इतिहास नाही. त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली, याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. नाशिक शहरातील कोरोनामुळे हा पहिला बळी असून जिल्ह्यातील हा तेरावा बळी आहे.
कोरोनामुळे 20 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू, नाशिक शहरातील पहिला बळी
शहरातील बजरंगवाडी परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला होता. तिचा कोरोना चाचणीचा अहवाल आला असून तो अहवाल पॉझिटीव्ह आहे.
रुग्णालय