लासलगाव ( नाशिक ) -सध्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांदा विक्रीस येत असून सर्व साधारण 900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. मात्र बदलत्या वातावरणाने कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना या दराचा काही फायदा होत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणाऱ्या कांद्याच्या दरात दररोज घसरण ( Daily fall in onion prices Nashik ) जरी होत असली, मात्र याच कांद्याने एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या 11 महिन्यात देशाला 2 हजार 973 कोटीचे परकीय चलन मिळवून देण्याची बाब समोर आली आहे.
कांद्यातून 2973 कोटीचे परकीय चलन :देशात एकूण 26 राज्यात कांदा पिकू लागल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ होत आहे. मात्र निर्यात जैसे थे असल्याने कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही. पण कांदा निर्यातीतून देशाला एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या 11 महिन्यात 13 लाख 23 हजार 710 मॅट्रिक टन कांदा निर्यात होऊन २९७३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. पुरवठ्यातील सातत्य, विश्वासार्हता आणि कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहचविण्याची भारतीय निर्यातदारांनी क्षमता यामुळे कांदा निर्यात सुरू आहे. केंद्राने शेतमाल निर्यातीसाठी दिर्घकालीन धोरण अवलंबल्यास निर्यातीत अजून लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना, कंटेनर भाड्यात घट, ट्रान्झिन्ट अनुदान या उपाययोजना केल्यास निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळेल आणि कांदा दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहे.
निर्यात आकडे :
२००९-१० - १८.७३ लाख टन -२८३४ कोटी