नाशिक- मनमाड शहरातील पानेवाडी परिसरात टँकरमधून बेकायदेशीरपणे पेट्रोल-डिझेल काढताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्यावर विविध कलमानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मालेगावात मुलांच्या भांडणातून राजकीय नेत्याचा पोलिसांसोबत वाद, पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावामुळे तणाव
याबाबत अधिक माहिती अशी, मनमाडनजीक असलेल्या पानेवाडी येथे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यासह गॅसचे टर्मिनल आहेत. या ठिकानाहून उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी इंधन पुरवठा केला जातो. यातील काही टँकर मालक व चालक हे बनावट चावीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे पेट्रोल व डिझेल काढून बाहेर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (शनिवारी) पहाटे भारत पेट्रोलियम समोरील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील मैदानात (एमएच-04-डीएस-0291) मधून टँकर मालक भाऊराव वसंत वाघ (वय 37 रा. बुद्धलवाडी मनमाड), टँकर चालक अप्पा गणपत घुगे (वय 38 रा. खादगाव) हे दोघे डिझेल काढताना आढळून आले.