नाशिक- नाशकातील पंचवटी येथील बाजारसमितीतील व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या आरोपींना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांतून त्यांची भीती कमी व्हावी यासाठी त्यांची धिंडही काढण्यात आली.
माहिती देताना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील बाजार समितीत बंदुकीचा धाक दाखवून, खंडणी मगितल्याची घटना सोमवारी घडली होती. यातील संशयित दोघांना अटक करण्यात आली केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नाशिक शहरात दहशतीचे वातावरण तयार होऊ नये व नागरिकांना निडर राहता यावे. यासाठी पंचवटी पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे. या खंडणी बहाद्दरावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यांच्या ठोळ्या अनेक जिल्ह्यात सक्रिय आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील सांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापारी राजेंद्र भागवत काटकर (वय ३५ वर्षे, रा.दत्तनगर पेठरोड) यांच्याकडे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संशयीत सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे हे गेले. त्यानंतर त्यांनी काटकर यांना बंदुकीचा धाक दाखवून डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केली. सायंकाळपर्यंत ५० हजार रूपये दे नाहीतर सायंकाळपर्यंत मारून टाकू, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचवटी पोलिसांनी सापळा रचून सागर जाधव, सागर भंडागे या दोनही संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.