नाशिक- मनमाडमधील पुणे महामार्गावर पुणे-अक्कलकुवा या एसटी बसचा आज पहाटे अपघात झाला. या अपघातामध्ये सुमारे १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ४० प्रवासी प्रवास करत होते. आज पाहटेच्या सुमार अनकवाडे गावाजवळ ही एसटी आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस उलटल्याने हा अपघात झाला.
मनमाडजवळ एसटी बसला अपघात; 18 प्रवासी जखमी - st bus
मालेगाव ते कोपरगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रोज मालेगाव ते मनमाड दरम्यान तसेच मनमाड ते कोपरगाव दरम्यान अपघाताच्या घटना घडतच आहेत. आज पहाटेदेखील साडेपाच वाजताच्या सुमारास पुण्याहून अक्कलकुवाला बस घेऊन जाणाऱ्या चालकाचे रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली गेली.
इंदोर-पुणे महामार्ग वारंवार अपघात होत आहेत. मालेगाव ते कोपरगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रोज मालेगाव ते मनमाड दरम्यान तसेच मनमाड ते कोपरगाव दरम्यान अपघाताच्या घटना घडतच आहेत. आज पहाटेदेखील साडेपाच वाजताच्या सुमारास पुण्याहून अक्कलकुवाला बस घेऊन जाणाऱ्या चालकाचे रस्त्यावरील खड्डे चुकविन्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली गेली.
अपघाताच्या आवाजाने स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि एसटीमधील प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर जखमी बस चालक व वाहकांसह प्रवाशांना मनमाड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणय़्ात आले आहे. उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून दिले इंदूर ते पुणे हा राजयमहामार्ग मनमाड शहरांतून जातो. मात्र या माहमार्गावरील एमएमकेपीएल या टोल कंपनीच्या वतीने हा रस्ता बीओटी तत्त्वावर वापरण्यात येतो. परंतु या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. यामुळे रोजच अपघात होत असून एक प्रकारे हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.