महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएम केअर फंडातील 17 व्हेंटिलेटर मनपाच्या बिटको हॉस्पिटलमध्ये धूळखात पडून

नाशिक जिल्ह्यात रोज 1 हजाराहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी हॉस्पिटलच्या दारोदारी फिरण्याची वेळ येत आहे. याच दरम्यान आता नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Ventilator
व्हेंटिलेटर

By

Published : Sep 5, 2020, 4:31 PM IST

नाशिक - कोरोनाबाधित रूग्णांची व्हेंटिलेटर मिळण्यासाठी ससेहोलपट होत असताना नाशिकच्या महानगरपालिका रुग्णालयात १७ व्हेंटिलेटर धूळखात पडल्याची धक्कादायकबाब उघड झाली आहे. केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर मिळालेले आहेत.

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. तर, 514 जणांचा अद्याप बळी गेला आहे. जिल्ह्यात रोज 1 हजाराहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड मिळण्यासाठी हॉस्पिटलच्या दारोदारी फिरण्याची वेळ येत आहे. याच दरम्यान आता नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये 100 खटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यासाठी सरकारच्या पीएम केअर फंडातून मिळालेले 17 व्हेंटिलेटर गेल्या दीड महिन्यांपासून धूळखात पडले आहेत.

पीएम केअर फंडातील 17 व्हेंटिलेटर मनपाच्या बिटको हॉस्पिटलमध्ये पडून

नाशिकमध्ये व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने महानगरपालिकेने पाठपुरावा करून केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडातून 23 व्हेंटिलेटर मिळवले. बिटको रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हे व्हेंटिलेटर ठेवण्यात आले. 17 व्हेंटिलेटरचा एक कक्ष तयार करून या ठिकाणी उपचार सुरू केला गेला. पंचवीस लिटर प्रति मिनिट प्रति व्हेंटिलेटर या पद्धतीने ऑक्सिजनचा दाब नियंत्रित करणे अपेक्षित असते. योग्य दाबाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मोठ्या टाक्या उपलब्ध नसल्याने हे व्हेंटिलेटर अजून सुरू करण्यात आले नसल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे. यातील 2 व्हेंटिलेटर तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खासगी हॉस्पिटला देण्यात आले आहेत.

बिटको हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर बंद असल्याने येथील रुग्णांना डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल आणि मराठा विद्या प्रसारकच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते आहे. मात्र, तेथे देखील अनेक वेळा रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. नातेवाईक आणि विरोधी पक्षाने याबाबत संताप व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details