नाशिक - टेबल टेनिस खेळातील चेंडू गिळल्याने 17 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जेलरोडच्या सानेगुरुजी नगर येथे घडली आहे. शिवांग संकेत बोराडे असे मृत बालकाचे नाव आहे.
Child Death : चेंडू गिळल्याने 17 महिन्याच्या बाळाचा मृत्यू - Bitco hospital nashik
टेबल टेनिस खेळातील चेंडू गिळल्याने 17 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जेलरोडच्या सानेगुरुजी नगर येथे घडली आहे.
जेलरोडच्या सानेगुरूजी नगर येथील सुगंध बंगल्यात शिवांग संकेत बोराडे (वय 17 महिने) हा चिमुरडा पालकांसह राहतो. 13 मे रोजी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खेळता खेळता शिवांगने पावणे दहाच्या सुमारास घरातील टेबल टेनिसचा चेंडू गिळला. त्याचा श्वास गुदमरला. त्या त्याला खूपच अस्वस्थ वाटू लागले. पालकांनी त्याला त्वरित बिटको रुग्णालयात दाखल केले. डॉ. ओस्तवाल यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. दरम्यान चिमुकल्याचे निधन झाले. सिस्टर कोतवाल यांनी या घटनेची माहिती उपनगर पोलीस ठाण्याला कळविली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.