महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या रामकुंड परिसरातील 17 प्राचीन कुंड होणार पुनर्जीवित - court

कुंडाचे पुनर्जीवित म्हणजेच कॉंक्रिटीकरण हटवण्यासाठी गोदावरी प्रेमी देवांग जानी यांनी लढा दिला. त्यांनी हे कुंड पुनर्जीवित करावे यासाठी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती.

नाशिक गीदावरी नदीतील कुंड होणार पुनर्जीवित

By

Published : May 15, 2019, 11:26 PM IST

नाशिक- रामकुंड परिसरातील 17 प्राचीन कुंड आता पुनर्जीवित होणार आहेत. गोदाप्रेमी देवांग जानी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला हे कुंड पुनर्जीवित करण्याचे आदेश दिलें आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर स्मार्ट सिटी अंतर्गत या कामाला सुरुवात होणार असून गोदावरी नदी यामुळे मोकळा श्वास घेणार आहे.

नाशिकच्या रामकुंड परिसरातील 17 प्राचीन कुंड होणार पुनर्जीवित

गोदावरी नदी ही स्वयंभू आणि स्वावलंबी नदी आहे. रामकुंड परिसरात ज्यात रामकुंड आज विभागले गेले आहेत, त्याखाली पुरातन कुंड, झरे आहेत. या रामकुंड परिसरात रामगया कुंड, दधाशवंमेघ कुंड, दुतोंडया मारुती कुंड, सूर्य कुंड, सीता कुंड, रामकुंड, अहिल्याबाई कुंड, सारंगपाणी कुंड, सीता कुंड असे जवळपास 17 कुंड होती. मात्र, काळाच्या ओघात आणि सिहस्थ कुंभमेळा काळात या ठिकाणी महानगरपालिकेने काँक्रीटीकरण केल्याने हे कुंड नामशेष झाली होती. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने गोदावरी परावलंबी झाली.

कुंडाचे पुनर्जीवित म्हणजेच कॉंक्रिटीकरण हटवण्यासाठी गोदावरी प्रेमी देवांग जानी यांनी लढा दिला. त्यांनी हे कुंड पुनर्जीवित करावे यासाठी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. या आधी देवांग जानी यांनी सर्व अभ्यास केला, इसवी सन 1700 च्या सुमारास गोपिकाबाई पेशवे, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महान व्यक्तींनी त्या काळात येथे कुंड तयार केले होते. त्याचा अभ्यास करून अशी कुंडे कुठे आहेत ते शोधून काढले, 1783 मध्ये ब्रिटिशांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियरची मदत घेतली, ब्रिटिशांनी 1917 मध्ये भूमी अभिलेख कार्यालय सुरू केले होते. त्यावेळी जमिनीचे जमा केलेले दस्तावेज तसेच नकाशे या सर्वांचीच मदत घेतली. याशिवाय जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी मदत घेतली आणि याची सर्व माहिती न्यायालया समोर मांडण्यात आली. त्यानुसार उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला हे कुंड पुनर्जीवित करण्याचे आदेश दिले आहेत.

माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे या विषयासाठी पाठपुरावा केला, तेव्हा 2017- 18 मध्ये कॉंक्रिटीकरण हटवण्यासाठी त्यांनी अंदाजपत्रकात तरतूद केली होती, मात्र स्मार्ट सिटीचा विषय पुढे आला त्यानी हा प्रोजेक्ट गोदावरीचा आराखडा तयार केला त्यासाठी समितीकडून दत्तक घेतले आणि त्यानुसार कामकाज सुरू केले होते. मात्र, मध्यंतरीच्या काळात हा प्रश्न पुन्हा रेंगाळा होता. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत निविदा काढून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले आहे.

यामुळे गोदवरी नदीत असलेले जिवंत पाण्याचे झरे पुनर्जीवित होतील आणि गीदावरी नदी स्वावलंबी होईल हे मात्र नक्की आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details