नाशिक -शहरातील रुग्णालयात कोरोनाचे १५ नवे संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवले असून आज सायंकाळपर्यंत अहवाल येणार आहे. मात्र, यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशकात कोरोनाचे 15 नवे संशयित रुग्ण दाखल, आज येणार अहवाल - कोरोना भारत
कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या २२५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे नाशिककर निश्चिंत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील लासलगाव या ग्रामीण भागातील एक तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात देखील कोरोना बाधितांची संख्या २२५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत नाशिकमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे नाशिककर निश्चिंत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील लासलगाव या ग्रामीण भागातील एक तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाबाधित तरुणाने आतापर्यंत कधीच परदेशवारी केली नसून त्याला हा संसर्ग कोणापासून झाला याबाबत प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली आहे. या तरुणाच्या कुटुंबातील लोकांना खबरदारी म्हणून कोरोना कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच नाशकातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एकूण १५ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल आज येणार आहेत.
नाशिकमध्ये आतापर्यंत 72 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज परदेशातून आलेल्या 517 नागरिकांना होम क्वारंनटाईन करण्यात आले असून त्यांचे जिल्हा प्रशासना मार्फत सर्वेक्षण सुरू आहे. नाशिकमध्ये सापडलेला कोरोनाबाधित तरुण हा कुठेही परदेशात गेला नाही तरी त्याला संसर्ग झाला आहे. त्यामुळे नागरीकांनी गर्दीत जाणे टाळावे, प्रशासन देत असलेल्या सूचनांचे पालन करावे, घरी राहून स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सौदाणे यांनी दिला आहे.