नाशिक- जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी येथे १४ वर्षीय मुलाचा पोहताना विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यश कांतिलाल उगले (१४), असे मृत मुलाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तळेगाव दिंडोरी येथे पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू - नाशिक लेटेस्ट न्युज
नाशकातील तळेगाव दिंडोरी येथे आठवीत शिकणाऱ्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. यश कांतिलाल उगले, असे मृताचे नाव असून याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यश हा दिंडोरी येथे जनता इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ८वी मध्ये शिकत होता. तो सकाळपासून घरात नसल्याने आईने त्याचा शोध सुरू केला. मात्र, यश कुठेच सापडला नाही. सायंकाळ झाल्यावर देखील यश घरी न परतल्याने आईच चिंता वाढली. त्यानंतर तो सकाळच्या सुमारास विहिरीकडे जाताना दिसता होता, असे समजताच गावातील नागरिक विरोबा येथील विहिरीजवळ गेले. मात्र, यशला विहिरीच्या पाण्यात शोधणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर पिंपळगाव केतकी येथील पट्टीचे पोहणारे आणि पाण्यातील मृतदेह शोधून काढणारे रामदास यांना बोलावण्यात आले. त्यांनी यशचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलीस कर्मचारी आव्हाड यांनी सांगितले.