महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Bhrati : पाेलीस भरतीसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून; वेळापत्रक जाहीर - Police Bhrati in Nashik

नाशिकमध्ये १७९ रिक्त पदांसाठी भरती पार पडणार ( Police Bhrati in Nashik ) आहे. राज्यात १४ हजार जागांसाठी ही भरती होत ( 14 thousand Police Bhrati in Maharashtra ) आहे.  शिपाई पदाच्या चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Police Bhrati in Nashik
पोलीस भरती

By

Published : Dec 31, 2022, 1:25 PM IST

नाशिक : जिल्हा पोलीस दलातील १७९ रिक्त पदांच्या भरती ( Police Bhrati in Nashik ) प्रक्रियेसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे तब्बल २१ हजार ४९ अर्ज पात्र ठरले आहेत. म्हणजे एका जागेसाठी सरासरी ११७ पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. दरम्यान, उमेदवारांची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून सुरू हाेणार असून, लेखी परीक्षेसाठी सुमारे ५ हजार उमेदवार पात्र ठरु शकण्याचा अंदाज आहे. राज्यात १४ हजार जागांसाठी ही भरती हाेत असून अठरा लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले ( 14 thousand Police Bhrati in Maharashtra ) आहेत.

अर्ज पडताळणी पूर्ण झाली :नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलीस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली असून, मैदानी चाचणीचे ‘स्लॉट’ करण्यात आले आहेत. उमेदवारांची मैदानी चाचणी आडगाव येथील ग्रामीण पोलिसांच्या कवायत मैदानात होणार आहे. २ ते २० जानेवारीपर्यंत ही चाचणी होईल. २ व ३ जानेवारी रोजी चालक पदांच्या उमेदवारांची चाचणी होईल. यानंतर शिपाई पदाची चाचणी सुरु ( Constable Post Exam Started ) होईल. त्यासंदर्भातले वेळापत्रक जाहीर झाले असून, ( Police Bhrati Exam Schedule Announced ) उमेदवारांना त्यासंदर्भात कळवण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यानी सागीतले आहे.




उनेदवारांची संख्या वाढली :राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने अंतिम रिक्त पदांची यादी जाहीर केल्यानुसार जिल्हा पाेलिस दलासाठी १७९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार २०१९ नंतर पोलीस भरती होत असल्याने उमेदवारांची संख्या वाढल्याचा अंदाज अधीक्षक कार्यालयाने व्यक्त केला आहे. तर, मैदानी चाचणीनंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे. ५०० अधिकारी-कर्मचारी मंत्रालयीन कर्मचारीही तैनात रुग्णवाहिका, पोलीस व्हॅन असणार डॉक्टरांचे पथक मैदानालगतच संपूर्ण चाचणीचे सीसीटीव्ही चित्रीकरण हाेणार अधिकृत व्यक्तिलाच प्रवेश असणार कहे.

ABOUT THE AUTHOR

...view details