नाशिक - जिल्ह्यातील चांदवड घाटात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तीन ट्रक आणि एका कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये १२ ते १५ जण गंभीर जखमी झाले असून १५ हून अधिक जण किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये सर्व परप्रांतियांचा समावेश आहे.
नाशकात ३ ट्रक अन् एका कारचा अपघात, ट्रकमधील परप्रांतीय मजूर जखमी - truck and car accident in nashik
परप्रांतीय मजूर मुंबईहून ट्रकने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. चांदवड घाटातील गतीरोधकामुळे कार हळू-हळू चालली होती. मात्र, ट्रक भरधाव वेगात असल्याने कारला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला.
![नाशकात ३ ट्रक अन् एका कारचा अपघात, ट्रकमधील परप्रांतीय मजूर जखमी chandwad ghat nashik accident labor accident in chandwad nashik labor injured chandwad ghat accident परप्रांतिय मजूर जखमी चांदवड घाट अपघात चांदवड घाट अपघात नाशिक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7148394-251-7148394-1589174781457.jpg)
परप्रांतीय मजूर मुंबईहून ट्रकने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. चांदवड घाटातील गतीरोधकामुळे कार हळू-हळू चालली होती. मात्र, ट्रक भरधाव वेगात असल्याने कारला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला. यावेळी मागून येणारे दोन ट्रकही आदळले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला. तसेच जखमींना मालेगाव आणि चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे वाहतूक दोन तासाहून अधिक वेळ खोळंबली होती. चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. काही वेळ मदतकार्य पोहोचू न शकल्याने अनेकजण अडकून पडले होते. जे जखमी झाले आहे त्यांना मालेगाव आणि चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय.