नाशिक - दहा किल्ल्यांसाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी आणणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. तसेच नवीन सरकारने डिपीडिसीच्या निधीतील 5 ते 10 टक्के निधी किल्ले संवर्धनासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
दहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी आणणार - संभाजीराजे - sambhaji raje bhosale news
दहा किल्ल्यांसाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी आणणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. तसेच नवीन सरकारने डिपीडिसीच्या निधीतील 5 ते 10 टक्के निधी किल्ले संवर्धनासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
देशातील पहिल्या लाखो फुलांच्या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. यावेळी बेळगावच्या सीमाप्रश्नावर बोलताना, हा प्रश्न सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन सोडवायला हवा असे छत्रपती म्हणाले.
एका दिवसात किल्ले पाहून होत नसल्याने गंडांवर राहण्याची सोय असावी, असा सूर पर्यंटकांमधून येत आहे. यासंदर्भात बोलताना, हा संदिग्ध विषय असून यामध्ये पुरातत्व विभागाने दिलेली नियमावली मोडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे वनपालासारखे गडपाल नावाचे पद अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. पुरातत्व खात्याशी यासंर्भात बोलणे चालू असून हे पद निर्माण झाल्यानंतर पर्यटकांना राहण्याची परवानगी देता येईल, असे त्यांनी सांगितले.