महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगावकरांसाठी 10 टन तांदळाची मदत रवाना, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा - जिल्हाधिकारी सुरज मांढरे news

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या पुढाकाराने व समृद्धी महामार्गाचे एका टप्प्यातील काम करणारी अँफकाँन्स कंपनीच्या सहकार्याने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे.

वाहन रवाना करताना जिल्हाधिकारी
वाहन रवाना करताना जिल्हाधिकारी

By

Published : Apr 8, 2020, 12:27 PM IST

Updated : Apr 8, 2020, 11:51 PM IST

नाशिक- जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. संचारबंदीमुळे अनेकांना खाण्या-पिण्याची अडचण भासत आहे. यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या पुढाकाराने व समृद्धी महामार्गाचे एका टप्प्यातील काम करणारी अँफकाँन्स कंपनीच्या सहकार्याने मालेगावकरांसाठी दहा हजार किलो तांदळाची मदत करण्यात आली आहे.

बोलताना जिल्हाधिकारी

तांदळाने भरलेल्या ट्रकला जिल्ह्याधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत गाडी रवाना केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, अँफकाँन्स कंपनीचे शेखर दास आदी उपस्थित होते.

यावेळी मालेगावकरांना उद्देशून जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडविण्यास स्थानिक प्रशासन कटिबद्ध आहे. मालेगाव तालुक्यात 'कोरोना' बाधित एकही रुग्ण आजतागायत आढळून आलेला नाही. ही आनंदाची बाब आहे. याचे सर्व श्रेय स्थानिक प्रशासनासह संपूर्ण मालेगाव तालुक्यातील नागरिकांना जाते. तरी देखील आज काही भागात नागरिक अन्न व पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांनी घराबाहेर पडणे हे केवळ आपल्याच नाही तर समाजातील इतरांच्याही जीवाशी खेळण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आपत्ती काळात ज्या काही सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून मदत घेण्यात येत आहे. तर प्रशासनामार्फत प्रभावित झालेल्या गरजू लाभार्थी ज्यांना शासनाकडून कुठलाही लाभ मिळत नाही, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, मोल मजुरी, शेतमजूर अशा तळागाळातील लाभार्थ्यांसाठी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून दहा हजार किलो तांदूळ आज मालेगावकडे रवाना करताना मला आनंद होत आहे. मला विश्वास आहे की मालेगाव येथील स्थानिक प्रशासनामार्फत याचे नियोजनबद्ध वितरण करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचविली जाईल. आपत्ती काळात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. नागरिकांकडून आज तागायत भरपूर सहयोग मिळाला आहे, अजून काही दिवस संयम बाळगण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी केले.

हेही वाचा -लॉकडाऊन : 'आर्यावर्त' सोसायटी समितीतर्फे दररोज 200 गरजूंना जेवण

Last Updated : Apr 8, 2020, 11:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details