महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक विभागात दहावीचा निकाल 10 टक्क्यांनी घसरला; कारण.. - percentage

शिक्षण विभागाने १७ जूनपासून प्रत्येक मुख्यधापक, शिक्षक यांना विषय कृती पत्रिकाबाबत एक दिवसाचे सक्तिचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर शिक्षकांनी दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नाशिक विभागात दहावीचा निकाल

By

Published : Jun 8, 2019, 4:36 PM IST

नाशिक - दहावीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये नाशिक विभागाचा यंदाचा निकाल ७७.५८ टक्के इतका लागला असून, गेल्यावर्षी या निकालाची टक्केवारी ८७.४२ टक्के इतकी लागली होती. यंदा मात्र ती १० टक्क्यांनी निकाल खाली घरसला आहे. मात्र मुलींनी बाजी मारत त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८२.८२ इतकी राहिली.

नाशिक विभागात दहावीचा निकाल

यंदाच्या वर्षी निकाल कमी लागल्याची अनेक कारणे सांगता येतील, यात १० वीच्या विद्यार्थ्यांपर्यँत अनेक शाळांकडून विषय कृतीपत्रिकेची माहिती पोहोचली नाही. चार जिल्हात २५ भरारी पथक तसेच प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आले होते. तरीही विभागात २३६ कॉपी प्रकरणी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यासोबत यंदाच्या वर्षी ४ विषयांना देण्यात येणारे अंतर्गत गुण (इंटर्नल मार्क) कमी केल्याने याचा परिणाम यंदाच्या वर्षी टक्केवारी झाल्याचे दिसते.

शिक्षण विभागाने १७ जूनपासून प्रत्येक मुख्यधापक, शिक्षक यांना विषय कृती पत्रिकाबाबत एक दिवसाचे सक्तिचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानंतर शिक्षकांनी दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षणानंतर पुढील वर्षी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढेल, असा विश्वास शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एक नजर निकालावर
नाशिक ७८.८६, धुळे ७७.११, जळगाव ७६.९२, नंदुरबार ७४.४४, एकूण ७७.५८
उत्तीर्ण झालेल्या मुले/मुली
मुले ७२.१८, मुली ८२.८२

ABOUT THE AUTHOR

...view details