नाशिकAapla Dawakhana :शहरात 45 पैकी केवळ चुंचाळेत येथे एक दवाखाना सुरू आहे. (CM Eknath Shinde) त्यामुळे प्रकल्पासाठी प्राप्त दहा कोटीचा निधी परत जाणार आहे, 'आपला दवाखाना' ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना राबविण्याचं ठरवलं होतं. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच सत्तांतर झाले. नाशिकमध्ये सुरुवातीला 45 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू केले जाणार होते; परंतु वर्षभरात केवळ चुंचाळे घरकुल शिवारात दवाखाना सुरू झाला. (fund for Aapla Dawakhana)
घरमालकानेच जबाबदारी घ्यायची :सरकारी रुग्णालयात दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभाग अशा तत्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. महानगरपालिकेकडून 25 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. एक दवाखान्याला 500 ते 1000 चौरस फूट जागा मनपाकडे उपलब्ध नसल्यास नागरी वस्तीतच 50 हजार ते एक लाखापर्यंत भाडेतत्त्वावर जागा घेण्याचे निर्देश आहेत; मात्र यात घरमालकालाच वीज बिल, पाणी बिल आणि स्वच्छतेच्या जबाबदारी बाबत निर्देश देण्यात आले आहेत.
निधी परत जाणार :दवाखान्याच्या निर्मितीसाठी प्रत्येकी 43 लाख 47 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून सुमारे दहा कोटींचा निधी प्राप्त झाला होता; मात्र आता जागा उपलब्ध होत नसल्यानं आणि काही जाचक अटी असल्यानं हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.