नाशिक -गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची दखल घ्यावी. तसेच केंद्र सरकारने 20 रुपये प्रती किलो दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी करण्यासाठी 1 लाख पत्र लिहिण्याची मोहीम हाती घेतली आहे. 22 ते 28 मे दरम्यान ही मोहीम चालणार आहे.
कांद्याला मातीमोल भाव, शेतकऱ्यांनी लिहिले थेट पंतप्रधानांना पत्र
कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसानात असूनदेखील शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात झालेली घसरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे सरासरी दर हे सहा ते सात रुपये किलोवर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून काढणे कठीण झाले आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक नुकसानात असूनदेखील शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात झालेली घसरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने 20 रुपये प्रती किलोने कांदा खरेदी करावा अशी मागणी लेखी स्वरुपात करण्यात आली आहे.
दरम्यान, पंतप्रधानांना 1 लाख पत्र पाठवण्याच्या या अनोख्या मोहिमेबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी माहिती दिली. ही मोहीम 22 मेपासून सुरू करण्यात आली असून 28 मेपर्यंत सुरू राहणार आहे. यात राज्यातील 1 लाख शेतकरी हे स्वतः पत्र लिहून त्या-त्या गावातील टपाल कार्यालयाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र पाठवणार आहेत. या मोहिमेत नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, परभणी, अकोला, वाशिम, बुलडाणा यासह राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी सक्रीय सहभाग घेणार आहेत. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार न्याय देणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.