नंदुरबार - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आज होत आहे. यासाठी शहादा तालुक्यात मतदारांचा प्रतिसाद सकाळपासूनच मिळत आहे. शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदार केंद्रावर मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. कडाक्याचा थंडीत मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले आहेत.
दुपारी एक वाजेपर्यंत 38 टक्के मतदान ही वाचा-'हे सरकार खोटारड्यांचं; तोंड उघडलं की खोटं बोलतात'; अनुराग कश्यप यांची रोखठोक प्रतिक्रिया!
शहादा तालुक्यात 14 गट व 28 गणांसाठी 308 मतदान केंद्र असून 2 लाख 51 हजार 176 मतदार आहेत. शहादा तालुक्यात मतदारांचा प्रतिसाद सकाळपासून पाहण्यास मिळत आहे. नवापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरुपसिंग नाईक व विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच विधान परिषदेचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार तालुक्यातील सोनगीर पाडा या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे अहावान केले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत 10 टक्के मतदान
मतदानाची तालुका निहाय आकडेवारी
नंदुरबार तालुका- 8.30
नवापूर तालुका -12.45
तळोदा तालुका- 9.33
शहादा तालुका - 8.04
आक्रानी तालुका- 8.07
अक्कलकुवा तालुका 10.39
- 3:00 PM- अपंग मतदारांसाठी कुठली ही सुविधा नाही
- 1:00 PM- अंदाजे 38 टक्के मतदान
- 11.30 PM मतदानाचा टक्का 24.87 टक्के मतदान
- 12:30 PM- आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला