नंदुरबार - जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना आमने-सामने आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉलही सजू लागले आहेत.
प्रचार साहित्यांनी सजली दुकाने हेही वाचा-'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात'
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना लागणारे स्कार्फ, झेंडे व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात उमेदवारांना खरेदी करावे लागत आहे. प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना इतरस्त्र जाण्याची गरज नाही. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रचार साहित्याचे स्टॉल लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष्यांच्या, अपक्ष उमेदवारांच्या प्रचार साहित्यांची स्टॉल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लागल्यामुळे ग्रामीण कार्यकर्ता या स्टॉलकडे वळू लागला आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.
प्रचारासाठी लागणारे साहित्यांनी दुकाने सजली आहेत. विविध आकारातील आणि रंगातील हे साहित्य राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आकर्षून घेत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकांना सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर समोर जात असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातवरण तापले आहे. राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांकडून या प्रचार साहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.