महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार : थंडीची चाहूल लागल्याने युवकांची जीमकडे धाव; तर काहींची पारंपारीक व्यायामाला पसंती - युवकांची जीमकडे धाव

थंडीची चाहुल लागल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तरुणाई व्यायामाकडे वळाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. भल्या पहाटे तरुण मंडळी पारंपारीक व्यायामाला तर काही तरुणाई अत्याधुनिक जीममध्ये जाण्याचे पसंद करत आहे.

Nandurbar youth news
Nandurbar youth news

By

Published : Nov 23, 2021, 3:42 AM IST

Updated : Nov 23, 2021, 9:03 PM IST

नंदुरबार - थंडीची चाहुल लागल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तरुणाई व्यायामाकडे वळाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. भल्या पहाटे तरुण मंडळी पारंपारीक व्यायामाला तर काही तरुणाई अत्याधुनिक जीममध्ये जाण्याचे पसंद करत असल्याने या दोन्ही माध्यमातून तरुणाईची व्यायामाशी नाळ जोडली गेल्याचे दिसून येत आहे. हिवाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा रहावी, यासाठी तरुणांसह तरुणी व्यायाम करताना दिसून येत आहेत.

प्रतिक्रिया

शरीर सुदृढ व्हावे यासाठी तरुण उत्साही -

गुलाबी थंडी म्हटली तर चाहुल लागते ती अल्हाददायक वातावरणाची आणि याच अल्हाददायक वातावरणात जॉगिंगसह व्यायामाची मजा काही निराळीच याची अनुभुती सध्या नंदुरबारकर घेतानाचे चित्र भल्या पहाटे रस्तांवर दिसून येत आहे. गोड गुलाबी थंडीत पारंपारीक व्यायाम करत थंडीत शरीराला सुदृड थेवण्याची तरुणाईची ही ओढ त्यांची पारंपारीक व्यायामा प्रतिच प्रेमच जणु व्यक्त करत आहे. त्यामुळे नंदुरबारच्या रत्यांलगत लावण्यात आलेल्या ओपन जीममध्ये कसरत करण्यासोबत पारंपारीक मैदाणात त्यांची व्यायामाची लगबग बरेच काही सांगुन जात आहे.

आधुनिक जिमकडे युवकाची पसंती -

पारंपारीक व्यायामासोबत सध्या तरुण मंडळी ही अत्याधुनिक जीमलादेखील पसंदी देत आहे. सकाळच्या सत्रात जीममध्ये व्यायामासाठी होत असलेली गर्दी तरुणाईचे शरीर सौष्ठ राखण्यासाठीची लगबगच दाखवून जात आहे. ट्रेडमीलवरचा वॉक असो, की इतर अत्याधुनिक व्यायाम मशीनांच्या सहाय्याने शरीराला पिळदार बनविण्याची मेहनत यातून व्यायामाची गोडी दिसून येत आहे. सकाळी पाच वाजेपासून तरुण वर्ग आधुनिक जिममध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. आधुनिक पद्धतीच्या साहित्यासोबत युवकांनी चांगलेच जुळून घेतल्याने व्यायाम करताना चांगलेच रमून जातात, अशी प्रतिक्रिया जिम ट्रेनर यांनी दिली. व्यायाम मैदानी असो कि, अत्याधुनिक जीम मधला व्यायाम, तो गुलाबी थंडीत भल्या पहाटे उठून करण्यासाठीची कसरतच या खुलेल्या मोसमाचा आनंद घेण्याची ओढच म्हणावी लागेल. व्यायामाचे माध्यम कुठलेही असो यातून निरोगी शरीर आणि स्वच्छंद मन याची होणारी अनुभुतीच महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधातील 'ही' मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली; पुढील सुनावणी 20 डिसेंबरला

Last Updated : Nov 23, 2021, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details