महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूरच्या बारी गावातून 3 ट्रक लाकूड जप्त; गुजरात आणि महाराष्ट्र वनविभागाची कारवाई - लाकूड तस्करी

जिल्ह्यातील लाकूड तस्करांवर गुजरात आणि महाराष्ट्र वनविभागाने संयुक्त कारवाई केली असून 3 ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.

लाकूड साठा जप्त

By

Published : Aug 29, 2019, 10:37 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरु असलेली लाकूड तस्करी थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, अपुरा फौजफाटा असल्याने या मोहिमा यशस्वी झाल्या नाही. दरम्यान, यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात वनविभागाने संयुक्त कारवाई केली असून 3 ट्रक लाकूड जप्त केले आहे.

नवापूर तालुक्यातील बारी गावातून 3 ट्रक लाकूड जप्त
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या डांग परिसरातून मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड करून तस्करी केली जाते. ही तस्करी दोन्ही राज्यांच्या सीमेवर होत असल्याने वनविभागाला कारवाईसाठी मोठी अडचण निर्माण होत असे, परंतु यावेळी गुजरात राज्यातील तापी आणि डांग जिल्ह्यातील वन विभाग, तसेच महाराष्ट्रातील नंदुरबार, शहादा, आणि नवापूर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा फौजफाटा तैनात करुन नवापूर तालुक्यातील बारी गावात तीन ट्रक साग, सिसम, आणि अन्य जातीच्या लाकडांचा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुद्देमालावर गुजरातमधील व्यारा येथे व्हिडीओग्राफीद्वारे पंचनामा सुरु आहे. या कारवाईत लाकूड तस्कर आरोपी मात्र, फरार झाले आहेत. वनविभागाला आरोपींबद्दल माहिती मिळाली असून लवकरच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबारचे उपविभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details