महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात वाईन शॉप्स उघडली; मद्य शौकिनांची सकाळपासूनच गर्दी - people queue wine shop nandurbar

४ मे रोजी जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीचे आदेश दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाला विभागीय कार्यालयाकडून माहिती न मिळाल्यामुळे मद्यविक्री करण्यात आली नव्हती. मात्र, आज मद्यविक्री सुरू झाल्यामुळे मद्य शौकिनांनी सकाळपासूनच वाईनशॉपवर गर्दी केली.

liquor shop nandurbar
दारू दुकानांसमोर तळीरामांची रांग

By

Published : May 5, 2020, 12:46 PM IST

Updated : May 5, 2020, 12:51 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यात मद्य विक्रीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकळापासूनच दारू खरेदीसाठी तळीरामांची वाईन शॉप्सच्या बाहेर रांग लागल्याचे पहावयास मिळाले. यावेळी दारू खरेदीसाठी सुरक्षित अंतर ठेवून दारू विक्री केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वाईन शॉप्स उघडलीत

गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात मद्यविक्री बंद असल्यामुळे मद्य शौकीनांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते. ४ मे रोजी जिल्हा प्रशासनाने दारू विक्रीचे आदेश दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाला विभागीय कार्यालयाकडून माहिती न मिळाल्यामुळे मद्यविक्री करण्यात आली नव्हती. मात्र, आज मद्यविक्री सुरू झाल्यामुळे मद्य शौकिनांनी सकाळपासूनच वाईनशॉपवर गर्दी केली.

हेही वाचा-शिथीलता मिळताच नंदुरबारकरांची बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Last Updated : May 5, 2020, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details