नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. याचा अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. इतकेच नाही, तर अनेकांचे ठरलेले विवाह लॉकडाऊनमुळे पुढे ढकलावे लागले आहेत. मात्र, अशातही नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावात एक विवाह सोहळा संपन्न झाला. वधू-वरांचे माता पिता आणि भटजी यांच्या उपस्थितीत कुलस्वामिनी कानुबाई मातेसमोर हा लग्न सोहळा पार पडला.
जोडप्याने लॉकडाऊनमध्ये बांधली लग्नगाठ; आठ जणांच्या साक्षीने घेतले सात फेरे - wedding during lockdown
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून कुठलाही सामूहिक कार्यक्रम आयोजित करता येत नाही. त्यामुळे, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शनिमांडळ येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. रांजणे गावातील गणेश पाटील आणि नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील सुकन्या यांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.
जोडप्याने लॉकडाऊनमध्ये बांधली लग्नगाठ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून कुठलाही सामूहिक कार्यक्रम आयोजित करता येत नाही. त्यामुळे, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शनिमांडळ येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. रांजणे गावातील गणेश पाटील आणि नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील सुकन्या यांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. आठ जणांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाहसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत मास्कचाही वापर करण्यात आला.
Last Updated : May 4, 2020, 10:56 AM IST