नंदुरबार - जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या प्रवेश झाला आहे. त्यामुळे, भाजपमध्ये गटातटाचे राजकारण ऐन निवडणुकीच्या काळात सक्रीय झाले आहे. कळंबू येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारावरून वाद झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
शहादा तालुक्यातील कळंबू गावात भाजपचे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांची प्रचारसभा होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल आणि जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील यांच्यात भाजपच्या प्रचारवरून तू-तू-मै-मै झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील आणि जयपाल रावल यांच्यात चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे.