नंदुरबार - कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली. ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ब्राम्हणपुरी गटातल्या मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी 'भिंतीवरची शाळा' हा एक अनोखा उपक्रम राबवला. या माध्यमातून कोरोनाकाळात वेळेचा सदुपयोग करून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले आहेत.
ब्राह्मणपुरीत रंगल्या भिंतीवरच्या शाळा; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची वाढली गोडी - ब्राम्हणपुरा शिक्षणाचा नवा मार्ग
ब्राह्मणपुरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी गरीब वस्तीत जाऊन तेथील भिंतींवर अभ्यास रेखाटला. या माध्यमातून लहान मुलांना बारखडी, गणीत, विज्ञानाच्या काही संकल्पनाची माहिती पाहिज्या त्यावेळी भिंतीवरती उपलब्ध झाल्या, विद्यार्थ्यांना या माधम्यातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे.
गरीब वस्तीत रंगल्या शैक्षणिक भिंती
लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्यामुळे शाळा बंदच होत्या. तसेच ऑनलाईन शिक्षण घेण्याकरिता ब्राम्हणगावातील विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल नव्हते. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच होते. ही परिस्थिती पाहता ब्राह्मणपुरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी गरीब वस्तीत जाऊन तेथील भिंतींवर अभ्यास रेखाटला. या माध्यमातून लहान मुलांना बारखडी, गणीत, विज्ञानाच्या काही संकल्पनाची माहिती पाहिज्या त्यावेळी भिंतीवरती उपलब्ध झाल्या, विद्यार्थ्यांना या माधम्यातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे.