नंदुरबार - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का कमी होता. मात्र, मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत आहे. हे चित्र सर्वच केंद्रांवर पाहण्यास मिळत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मतदानाला मोठा प्रतिसाद; केंद्रावर मोठ्या रांगा - नंदुरबार ग्रामपंचायत मतदान
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का कमी होता. मात्र, मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत आहे.
मजूर वर्गाचा मतदानाला प्रतिसाद
ग्रामीण भागात शेतीकामांची लगबग सुरू असल्याने शेतकरी व मजूर वर्ग जर कामाला निघून गेले तर मतदान कमी होईल म्हणून सकाळपासून सर्वच उमेदवार शेतकरी व मजूर वर्गांना मतदान करून कामाला जाण्याचे अहावान करत होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जिल्ह्यात होत असलेल्या 64 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराची आरोग्य तपासणी करून मतदान केंद्रात प्रवेश दिला जात आहे.
ग्रामपंचायत निवडणूकची आकडेवारी
एकूण ग्रामपंचायत:- 87
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत:- 23
एकूण जागा:- 519
एकूण उमेदवार:- 1229
एकूण मतदार:-1 लाख 13 हजार
एकूण मतदान केंद्र:- 215
अधिकारी आणि कर्मचारी:-1290