नंदुरबार- नंदुरबार आदिवासीबहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, नागरिकांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती व्हावी. यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी गावोगावी जाऊन पथनाट्याद्वारे मतदार जागृती मोहीम युवारंग फाउंडेशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये पथनाट्याद्वारे मतदार जागृती मोहीम - युवारंग फाउंडेशन बातमी
नंदुरबार येथील युवारंग फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन स्थानिक बोलीभाषेतून मतदारांची जनजागृती करत आहे. जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राबविला जात आहे.
हेही वाचा-शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर
आदिवासी दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांमध्ये आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये कलापथकाच्या आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यासाठी नंदुरबार येथील युवारंग फाउंडेशन आणि जिल्हा प्रशासन स्थानिक बोलीभाषेतून मतदारांची जनजागृती करत आहे. जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राबविला जात आहे.
जिल्हा प्रशासन, नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघात युवारंग फाउंडेशन, नंदुरबार या कलापथकाद्वारे पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यात ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅड मशीनबाबत माहिती देण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त मतदान व्हावे, युवकांनी देखील मतदान करुन इतरांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे, अपंग व वयोवृध्द व्यक्तींना बुथवर जाण्यासाठी व्हीलचेअरच्या वापराबाबत ही जनजागृती करण्यात आली.