नंदुरबार - महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या शहादा तालुक्यातील असलोद काही दिवसांपूर्वी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, गावात बिअर शॉपी सुरू झाली आहे. दारूबंदी असतानाही बिअर शॉपीचा परवाना मिळालाच कसा, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कठोर पाऊल उचलावीत, ग्रामस्थांची मागणी
असलोद गावातील दारूबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याबरोबरच गावातील बेकायदेशीर धंदे बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी शहादा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.