महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहनांंची चोरी करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक - नंदुरबार दुचाकी चोरी

दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना नंदुरबार स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने एका पथकाची नियुक्ती करून दुचाकी चोरट्यांची शोधमोहीम हाती घेतली होती.

दुचाकी चोर
दुचाकी चोर

By

Published : Jan 7, 2020, 8:11 AM IST

नंदुरबार - धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना नंदुरबार स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले. खोजल्या वन्या तडवी (रा.बिजरीगव्हाण, ता.अक्कलकुवा, ह.मु.तळोदा) आणि संदिप सुनिल ठाकरे (रा.तळोदा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पावणे आठ लाख रुपये किमतीच्या सोळा दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

वाहनांंची चोरी करणाऱ्या दोघांना अटक


नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने एका पथकाची नियुक्ती करून दुचाकी चोरट्यांची शोधमोहीम हाती घेतली. तळोदा येथील बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. खोजल्या तडवी हा महागडी दुचाकी कमी किमतीत विकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस दिसताच त्याने पळ काढला.

हेही वाचा - सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झालाय, बाळासाहेब थोरातांचा प्रहार

गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून आरोपीला पकडले. त्याची चौकशी केली असता दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याने मागील सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, जळगाव आणि गुजरात राज्यातील अनेक शहरांतून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. त्याचा साथीदार संदिप सुनिल ठाकरे (रा.तळोदा) याला ताब्यात घेतले. या दोघांकडून 7 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 16 मोटारसायकल आणि चार चाकी गाडी हस्तगत करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, मुकेश तावडे, सुनिल पाडवी, जितेंद्र अहीरराव, युवराज चव्हाण, मोहन ढमढेरे, सतिष घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details